शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५ आरंभ नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो, आजपासुन ब्लॉगवर लिहायला सुरूवात करतोय. खुप सुचतं पण कामाच्या रगाड्यात वेळ मिळत नव्हता. आज लिहु उद्या लिहु असे करता - करता बराच काळ निघुन गेला आणि आता ठरवलयं की बस आता लिहायचं. मन मोकळं करायचं. साचलेल्याला मोकळं करायचं. मी व्यवसायाने प्राथमिक शिक्षक. लेखन, वाचन आणि अभिनयाची आवड. प्रवास करायची खुप आवड पण ते जमत नाही. चला म्हटल लेखन तरी करुया............. म्हणून आज शिक्षक दिनापासुन सुरूवात करतोय..........
रविवार, ६ सप्टेंबर, २०१५ स्वार्थ हा स्थायीभाव आहे का ? आज माझे फेसबुकचे पेज उघडले आणि दिलीप लिमये सरांनी टाकलेली पोस्ट वाचली..... त्यांनी फुलविक्रेत्या महिलांचे आणि त्यांच्या बाळाचे टाकलेले फोटो व त्यावर सुचवलेले विचार वाचुन गहीवरून आले. खरचं आपण आपल्या सभोवताली असलेल्या अशा किती गरजु लेाकांना अगदी सहजपणे मदत करू शकताे याची जाणिव झाली. तिकडे नाना पाटेकरजी , मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांना सावरण्याचा जो प्रयत्न चालविला आहे त्यात आपण सहभाग नोंदवु शकत नाही ही वाटणारी खंत लिमये सरांनी सुचविलेल्या विचारांनी थोडीफार कमी झाली............चला म्हटलं आपण एव्हढे मात्र नक्कीच करू शकताे. आधी तर पोस्ट वाचुन स्वत: ची लाज वाटली. हे आपल्याला अगोदर का सुचले नाही? का सुचू नयेे ? एव्हढे आपण स्वत: च्या कोशात कसे गुरफटत कसे जातो असा विचार मनात आला. त्याच पोस्टवर माझ्या एका भगिनीने असे लिहलय की , "हो हे आम्ही हे करत आलेलो आहेात. यात पाप पुण्याचा हिशोब नसतो." पण हे खरे आहे का? अब्राहम लिंकन एकदा म्हणाले होेते, की प्रत्येक गोष्ट करण्यामागे माणसाचा स्वार्थ असतो. एकदा त्यांनी चिखलात फसलेले डुकराचे पिल्लु बाहेर काढल्यावर गाडीवानाने त्यांना विचारले, "यात तुमचा काय स्वार्थ होता?" त्यावर लिंकन म्हणाले "त्ो चिखलात फसलेले पिल्लु बाहेर न काढता जर मी घरी परतलो असतो तर त्याचे काय झाले असेल या विचाराने माझी झोप उडाली असती, मी नीट झोपु शकलो नसतो. मला मानसिक समाधान मिळाले नसते.हा यामागे स्वार्थ होता". त्यावर गाडीवान निरूत्त्तर झाला. खरचं स्वार्थ हा माणस माणसाचा स्थायीभाव आहे का ? मग बाबा आमटे , प्रकाश आमटे आणि या श्रुखलेत येणारी अनेकजण जी कामे करताहेत त्यामागे कोणता भाव आहे.
शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५ अराजकतेचा बळी बळी काल मन उव्दिग्न करून सोडणारी घटना घडली........... माझा बंधु , राजकिय अराजकतेचा बळी ठरला. नकाशे सर ..............तुम्ही असं करायला नको होतं....... चोर सोडुन संन्याशाला फाशी देण्याची इथली परंपरा तुम्हाला माहीत नसेल असं मुळीच शक्य नाही सर...... तुम्हाला ज्यांंनी निलंबीत केलं .....................त्यांचे चारित्र्य ?????????????? लाखो करोडोंचा भ्रष्टाचार करणारे किती राजकारणी आतापर्यंत फासावर लटकलेत? साखर घोटाळा,युरीया घोटाळा, चारा घोटाळा, भुखंड घोटाळा, शिष्यवृत्ती घोटाळा सिंचन घोटाळा ..........................असे किती घोटाळे सांगायचे सर...... हे सगळं करणारे गेंड्याची कातडी पांघरून निर्लज्जपणे माना वर करून फिरतात आणि हे आपल्याला निलंबित करणार?........... सर, 30 किलो तांदुळ कमी भरला म्हणुन हे निलंबन करणारे नालायक जेव्हा स्वत: भ्रष्टाचार करतात तेव्हा त्यांना काय गोळ्या घालायच्या काय सर ? सर , तुम्ही मानी , निलंबनाची कार्यवाही तुमच्या पापभिरू मनावर आघात करणारच. पण त्यावर आत्महत्या करणे हा उपाय खचितच नव्हता सर. निलंबनाची कार्यवाही म्हटल्यावर तुमच्या मनात काय काय विचार आले असतील हे आम्ही समजु शकतो. एखाद्या निस्सिम देशभक्तावर देशद्रोहाचा आरोप झाल्यावर त्याने टोकाचे पाउुल उचलावे तसे तुमच्या बाबतीत झाले असेल. पण......... 30 किलो तांदुळ कमी भरणे हा भ्रष्टाचार ठरलाच नसता सर. कारण पुरवठा करतांना तांदुळाचे 50 किलोचे पोते हे आतापर्यंत कधी 50 किलोचे भरले आहेत? प्रत्येक पोते मोजुन घेण्याची कोणती साधने आपल्याला शासनाने पुरविली आहेत? अशा अनेक बाबी , अनेक कारणे होती ज्यामुळे तुम्ही निर्दोष आहात हे सिध्द झाले असते आणि शासनाचा नालायकपणाही उघड झाला असता...............पण.... तुम्ही खुप आताताायीपणे निर्णय घेतलात सर...... तुमच्या आत्महत्येने सगळे हवालदील झालेत, पेटुन उठलेत................ तुम्हाला भावपुर्ण श्रध्दांजली.
गोड आहे ना छोकरी .....डोळे बघा . नवलाईने पाहताहेत जगाकडे. डोळयात निव्वळ उत्सुकता सारं काही जाणुन घेण्याची.आणखी निट बघा. काय काय दिसतयं चेह-यावर ......... पण किती कळयांना असं जग पाहण्याचं भाग्य लाभतयं आणि किती कळयांना उमलण्याआधीच खुडल्या जातयं? सकाळी वर्तमानपञ उघडले की , काय वाचायला मिळेल याचा नेम नाही. मन धास्तावुन टाकणा-या , मन सुन्न करून सोडणा-या बातम्या वाचायला मिळतात. का एव्हढया बोथट झाल्या आहेत जाणिवा? कुठे गळुन पडली आहे संवेदनशिलता. का झाला आहे एवढा निर्दयी समाज. भौतिक सुख आणि मुलाला दिले जाणारे अवास्तव महत्व यात माणसातील माणुसकी का अशी हरवत चालली आहे ? काल परवाची घटना. एक महिन्याच्या निशाणिला तिच्या आईने चुलीत जाळुन मारले.........किती ही अमानुष घटना ही !!!!! काय दोष असेल त्या निर्दाेष जीवाचा ?.............. कशी असेल ती आई ? ........... आई ? ........ माता ? ......... कसं म्हणायचं "आई " त्या स्ञीला ? मुलगी झाली म्हणुन तिच्या स्ञीत्वाचा अपमान झाला होता की काय ? .....की तीला समाज जगुच देणार नव्हता ? ........ कुठे गेले तिच्यातले ममत्व ? का नसतील तिचे हात थरारले आपल्या चिमुकलीचा असा घात करतांना ? अशा कित्येक कळया आजही गर्भातच खुडल्या जात आहेत. कित्येक कळया चार दोन श्वासापुरत्या जगतात आणि फेकुन दिले जाते त्यांना कचराकुंडीत , नदी - नाल्याच्या काठी, उघडयावर . कित्येक वेळा तर कुञ्यांनी लचके तोडलेत या कोवळया कलेवरांचे. जेव्हा हे सर्व ती माता ऐकत असेल , वाचत असेल तेव्हा तिच्या काळजाला पीळ पडत नसतील का ? मग का वागत असतील त्या अशा ? काय मजबुरी असेल त्यांची आणि असेल तर ती एव्हढी की स्वत: च्या बाळाला मारून टाकण्या इतपत ? निशाणिला संपविणा-या त्या आईने पोलीसांना काय जबाब दिला- आम्ही गरीब आहोत , तीला जगवायचं कसं ? समाजातुनही तिला ' दुसरीही ' मुलगी झाली म्हणुन टोमणे ऐकावे लागत होते. गरिबी हे एका कोवळया जिवाला संपविण्याचा कारण असु शकते ? आणि असेलही तर आपली गरिबी एवढी टोकाची आहे हे तिला आणि तिच्या नव-याला त्या कोवळया जिवाला जन्माला घालण्यापुर्वी कळले नाही का? समाज टोमणे मारतो म्हणुन ............... एवढा अपमान होतो आपला टोमण्यांमुळे ? आणि मान अपमान या गोष्टी कितपत मानव्यात व अपमानामुळे मन एवढे बोथट व्हावे की संवेदनहीनतेमुळे आपण संपवावे आपल्याच काळजाच्या तुकडयाला......... कोणाला दोष दयायचा या अमानुष करणीचा. आईला , पित्याला , की समाजाला........... समाजाचा मुलींविषयी असलेली मानसिकता, समाजाचा मुलीकडे पाहण्याचा दृष्टीेकोनच याला कारणीभुत आहे. मुलगी ही परक्याचे धन म्हणुन तिच्या जन्मापासुन तिचे जगण्याचे हक्कच नाकारणारी मानसिकता अज्ञानामुळेच समाजात फोेफावत चालली आहे. याला पुरूषही तेवढेच जबाबदार आहेत. नाहीतर एक स्ञी आपल्या पोटच्या गोळयाला चुलीत जाळण्याइतके टोकाचे पाऊल का उचलेल. अशा किती कळया अजुन खुडल्या जातील ? किती ??? ....................या कोवळया जिवांचा मुक आक्रोश कुणाच्या काळजाला पीळ पाडणार नाही ?
शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५
उत्तर द्याहटवाआरंभ
नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो,
आजपासुन ब्लॉगवर लिहायला सुरूवात करतोय. खुप सुचतं पण कामाच्या रगाड्यात वेळ मिळत नव्हता. आज लिहु उद्या लिहु असे करता - करता बराच काळ निघुन गेला आणि आता ठरवलयं की बस आता लिहायचं. मन मोकळं करायचं. साचलेल्याला मोकळं करायचं.
मी व्यवसायाने प्राथमिक शिक्षक. लेखन, वाचन आणि अभिनयाची आवड. प्रवास करायची खुप आवड पण ते जमत नाही. चला म्हटल लेखन तरी करुया.............
म्हणून आज शिक्षक दिनापासुन सुरूवात करतोय..........
रविवार, ६ सप्टेंबर, २०१५
उत्तर द्याहटवास्वार्थ हा स्थायीभाव आहे का ?
आज माझे फेसबुकचे पेज उघडले आणि दिलीप लिमये सरांनी टाकलेली पोस्ट वाचली.....
त्यांनी फुलविक्रेत्या महिलांचे आणि त्यांच्या बाळाचे टाकलेले फोटो व त्यावर सुचवलेले विचार वाचुन गहीवरून आले.
खरचं आपण आपल्या सभोवताली असलेल्या अशा किती गरजु लेाकांना अगदी सहजपणे मदत करू शकताे याची जाणिव झाली.
तिकडे नाना पाटेकरजी , मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांना सावरण्याचा जो प्रयत्न चालविला आहे त्यात आपण सहभाग नोंदवु शकत नाही ही वाटणारी खंत लिमये सरांनी सुचविलेल्या विचारांनी थोडीफार कमी झाली............चला म्हटलं आपण एव्हढे मात्र नक्कीच करू शकताे.
आधी तर पोस्ट वाचुन स्वत: ची लाज वाटली. हे आपल्याला अगोदर का सुचले नाही? का सुचू नयेे ? एव्हढे आपण स्वत: च्या कोशात कसे गुरफटत कसे जातो असा विचार मनात आला.
त्याच पोस्टवर माझ्या एका भगिनीने असे लिहलय की , "हो हे आम्ही हे करत आलेलो आहेात. यात पाप पुण्याचा हिशोब नसतो."
पण हे खरे आहे का? अब्राहम लिंकन एकदा म्हणाले होेते, की प्रत्येक गोष्ट करण्यामागे माणसाचा स्वार्थ असतो. एकदा त्यांनी चिखलात फसलेले डुकराचे पिल्लु बाहेर काढल्यावर गाडीवानाने त्यांना विचारले, "यात तुमचा काय स्वार्थ होता?" त्यावर लिंकन म्हणाले "त्ो चिखलात फसलेले पिल्लु बाहेर न काढता जर मी घरी परतलो असतो तर त्याचे काय झाले असेल या विचाराने माझी झोप उडाली असती, मी नीट झोपु शकलो नसतो. मला मानसिक समाधान मिळाले नसते.हा यामागे स्वार्थ होता". त्यावर गाडीवान निरूत्त्तर झाला.
खरचं स्वार्थ हा माणस माणसाचा स्थायीभाव आहे का ? मग बाबा आमटे , प्रकाश आमटे आणि या श्रुखलेत येणारी अनेकजण जी कामे करताहेत त्यामागे कोणता भाव आहे.
शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५
उत्तर द्याहटवाअराजकतेचा बळी
बळी
काल मन उव्दिग्न करून सोडणारी घटना घडली...........
माझा बंधु , राजकिय अराजकतेचा बळी ठरला. नकाशे सर ..............तुम्ही असं करायला नको होतं.......
चोर सोडुन संन्याशाला फाशी देण्याची इथली परंपरा तुम्हाला माहीत नसेल असं मुळीच शक्य नाही सर......
तुम्हाला ज्यांंनी निलंबीत केलं .....................त्यांचे चारित्र्य ??????????????
लाखो करोडोंचा भ्रष्टाचार करणारे किती राजकारणी आतापर्यंत फासावर लटकलेत? साखर घोटाळा,युरीया घोटाळा, चारा घोटाळा, भुखंड घोटाळा, शिष्यवृत्ती घोटाळा सिंचन घोटाळा ..........................असे किती घोटाळे सांगायचे सर...... हे सगळं करणारे गेंड्याची कातडी पांघरून निर्लज्जपणे माना वर करून फिरतात आणि हे आपल्याला निलंबित करणार?...........
सर, 30 किलो तांदुळ कमी भरला म्हणुन हे निलंबन करणारे नालायक जेव्हा स्वत: भ्रष्टाचार करतात तेव्हा त्यांना काय गोळ्या घालायच्या काय सर ?
सर , तुम्ही मानी , निलंबनाची कार्यवाही तुमच्या पापभिरू मनावर आघात करणारच. पण त्यावर आत्महत्या करणे हा उपाय खचितच नव्हता सर. निलंबनाची कार्यवाही म्हटल्यावर तुमच्या मनात काय काय विचार आले असतील हे आम्ही समजु शकतो. एखाद्या निस्सिम देशभक्तावर देशद्रोहाचा आरोप झाल्यावर त्याने टोकाचे पाउुल उचलावे तसे तुमच्या बाबतीत झाले असेल. पण.........
30 किलो तांदुळ कमी भरणे हा भ्रष्टाचार ठरलाच नसता सर. कारण पुरवठा करतांना तांदुळाचे 50 किलोचे पोते हे आतापर्यंत कधी 50 किलोचे भरले आहेत? प्रत्येक पोते मोजुन घेण्याची कोणती साधने आपल्याला शासनाने पुरविली आहेत? अशा अनेक बाबी , अनेक कारणे होती ज्यामुळे तुम्ही निर्दोष आहात हे सिध्द झाले असते आणि शासनाचा नालायकपणाही उघड झाला असता...............पण....
तुम्ही खुप आताताायीपणे निर्णय घेतलात सर...... तुमच्या आत्महत्येने सगळे हवालदील झालेत, पेटुन उठलेत................
तुम्हाला भावपुर्ण श्रध्दांजली.
संवेदनहिनतेचा कळस .............
उत्तर द्याहटवागोड आहे ना छोकरी .....डोळे बघा . नवलाईने पाहताहेत जगाकडे. डोळयात निव्वळ उत्सुकता सारं काही जाणुन घेण्याची.आणखी निट बघा. काय काय दिसतयं चेह-यावर .........
पण किती कळयांना असं जग पाहण्याचं भाग्य लाभतयं आणि किती कळयांना उमलण्याआधीच खुडल्या जातयं?
सकाळी वर्तमानपञ उघडले की , काय वाचायला मिळेल याचा नेम नाही. मन धास्तावुन टाकणा-या , मन सुन्न करून सोडणा-या बातम्या वाचायला मिळतात. का एव्हढया बोथट झाल्या आहेत जाणिवा? कुठे गळुन पडली आहे संवेदनशिलता. का झाला आहे एवढा निर्दयी समाज. भौतिक सुख आणि मुलाला दिले जाणारे अवास्तव महत्व यात माणसातील माणुसकी का अशी हरवत चालली आहे ?
काल परवाची घटना. एक महिन्याच्या निशाणिला तिच्या आईने चुलीत जाळुन मारले.........किती ही अमानुष घटना ही !!!!!
काय दोष असेल त्या निर्दाेष जीवाचा ?..............
कशी असेल ती आई ? ........... आई ? ........ माता ? ......... कसं म्हणायचं "आई " त्या स्ञीला ?
मुलगी झाली म्हणुन तिच्या स्ञीत्वाचा अपमान झाला होता की काय ? .....की तीला समाज जगुच देणार नव्हता ? ........
कुठे गेले तिच्यातले ममत्व ? का नसतील तिचे हात थरारले आपल्या चिमुकलीचा असा घात करतांना ?
अशा कित्येक कळया आजही गर्भातच खुडल्या जात आहेत. कित्येक कळया चार दोन श्वासापुरत्या जगतात आणि फेकुन दिले जाते त्यांना कचराकुंडीत , नदी - नाल्याच्या काठी, उघडयावर . कित्येक वेळा तर कुञ्यांनी लचके तोडलेत या कोवळया कलेवरांचे. जेव्हा हे सर्व ती माता ऐकत असेल , वाचत असेल तेव्हा तिच्या काळजाला पीळ पडत नसतील का ? मग का वागत असतील त्या अशा ?
काय मजबुरी असेल त्यांची आणि असेल तर ती एव्हढी की स्वत: च्या बाळाला मारून टाकण्या इतपत ?
निशाणिला संपविणा-या त्या आईने पोलीसांना काय जबाब दिला- आम्ही गरीब आहोत , तीला जगवायचं कसं ? समाजातुनही तिला ' दुसरीही ' मुलगी झाली म्हणुन टोमणे ऐकावे लागत होते.
गरिबी हे एका कोवळया जिवाला संपविण्याचा कारण असु शकते ? आणि असेलही तर आपली गरिबी एवढी टोकाची आहे हे तिला आणि तिच्या नव-याला त्या कोवळया जिवाला जन्माला घालण्यापुर्वी कळले नाही का?
समाज टोमणे मारतो म्हणुन ............... एवढा अपमान होतो आपला टोमण्यांमुळे ? आणि मान अपमान या गोष्टी कितपत मानव्यात व अपमानामुळे मन एवढे बोथट व्हावे की संवेदनहीनतेमुळे आपण संपवावे आपल्याच काळजाच्या तुकडयाला.........
कोणाला दोष दयायचा या अमानुष करणीचा. आईला , पित्याला , की समाजाला...........
समाजाचा मुलींविषयी असलेली मानसिकता, समाजाचा मुलीकडे पाहण्याचा दृष्टीेकोनच याला कारणीभुत आहे. मुलगी ही परक्याचे धन म्हणुन तिच्या जन्मापासुन तिचे जगण्याचे हक्कच नाकारणारी मानसिकता अज्ञानामुळेच समाजात फोेफावत चालली आहे. याला पुरूषही तेवढेच जबाबदार आहेत. नाहीतर एक स्ञी आपल्या पोटच्या गोळयाला चुलीत जाळण्याइतके टोकाचे पाऊल का उचलेल.
अशा किती कळया अजुन खुडल्या जातील ? किती ??? ....................या कोवळया जिवांचा मुक आक्रोश कुणाच्या काळजाला पीळ पाडणार नाही ?