शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

अराजकतेचा बळी

                                                    बळी
       काल मन उव्दिग्न करून सोडणारी घटना घडली...........
                          माझा बंधु , राजकिय अराजकतेचा बळी ठरला.  नकाशे सर ..............तुम्ही असं करायला नको होतं.......
चोर सोडुन संन्याशाला फाशी देण्याची इथली परंपरा तुम्हाला माहीत नसेल असं मुळीच शक्य नाही सर......
तुम्हाला ज्यांंनी निलंबीत केलं .....................त्यांचे चारित्र्य  ??????????????
लाखो करोडोंचा भ्रष्टाचार करणारे किती राजकारणी आतापर्यंत फासावर लटकलेत? साखर घोटाळा,युरीया घोटाळा, चारा घोटाळा, भुखंड घोटाळा, शिष्यवृत्ती घोटाळा सिंचन घोटाळा ..........................असे किती घोटाळे सांगायचे सर......           हे सगळं करणारे गेंड्याची कातडी पांघरून निर्लज्जपणे माना वर करून फिरतात आ‍णि हे आपल्याला निलंबित करणार?...........
सर, 30 किलो तांदुळ कमी भरला म्हणुन हे निलंबन करणारे नालायक जेव्हा स्वत: भ्रष्टाचार करतात तेव्हा त्यांना काय गोळ्या घालायच्या काय सर ?
सर , तुम्ही मानी , निलंबनाची कार्यवाही तुमच्या पापभिरू मनावर आघात करणारच. पण त्यावर आत्महत्या करणे हा उपाय खचितच नव्हता सर. निलंबनाची कार्यवाही म्हटल्यावर तुमच्या मनात काय काय विचार आले असतील हे आम्ही समजु शकतो. एखाद्या निस्सिम देशभक्तावर देशद्रोहाचा आरोप झाल्यावर त्याने टोकाचे पाउुल उचलावे तसे तुमच्या बाबतीत झाले असेल. पण.........
   30 किलो तांदुळ कमी भरणे हा भ्रष्टाचार ठरलाच नसता  सर. कारण पुरवठा करतांना तांदुळाचे 50 किलोचे पोते हे आतापर्यंत कधी 50 किलोचे भरले आहेत? प्रत्येक पोते मोजुन घेण्याची कोणती साधने आपल्याला शासनाने पुरविली आहेत? अशा अनेक बाबी , अनेक कारणे होती ज्यामुळे तुम्ही निर्दोष आहात हे सिध्द झाले असते आणि शासनाचा नालायकपणाही उघड झाला असता...............पण....
                   तुम्ही खुप आताताायीपणे ‍निर्णय घेतलात सर...... तुमच्या आत्महत्येने सगळे हवालदील झालेत, पेटुन उठलेत................
                  तुम्हाला भावपुर्ण श्रध्दांजली.
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा